मुंबई, 15 मे : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी केल्याचं आतापर्यंत पाचवेळा उल्लेख केलाय. मात्र, हिंदुस्थान के तरफ आँख उठाने वालो को छोडूंगा नही असे म्हणणाऱ्या मोदींनी डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन त्याला उत्तर द्यायला ते तयार नाहीत. सांगा ना की, डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत आणि हे सांगण्याची जह हिंमत तुमच्यात नसेल तर महाशय, मेहरबानी करा अन् तुम्ही पंतप्रधान पदी राहू नका, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशावर मेहरबानी करावी, असेही ते म्हणाले आहेत.
तिरंगा यात्रेवरून राऊतांनी साधला निशाणा –
शस्त्रसंधी, युद्धविराम-माघार हाच विजय मानून आज एक पक्ष देशात विजय सोहळा साजरा करतात. शस्त्रसंधी हा विजय कसा असू शकतो. युद्धविराम हा दुसऱ्याच्या मध्यस्थीने झालाय. युद्धविरामामुळे अख्ख्या देशाला धक्का बसलाय आणि हे आज तिरंगा यात्रा काढताएत. खरंतर, यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. आणि तिरंगा नाही तर अमेरिकेचा झेंडा हाती घेतला पाहिजे. याची सुरूवात दिल्लीतील अमेरिकेच्या वकालतीपासून झाली पाहिजे आणि अमेरिकेतील व्हाईट हाऊसपर्यंत चालत जायचं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसेच जे.पी. नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा चालवली पाहिजे. दरम्यान, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवल्या पाहिजे आणि डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे, असं त्यांनी सांगितले पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
शिवसेनेला डिवचलं –
ऑपरेशन सिंदुरनंतर महायुतीकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवेसेना डिवचलंय. याबाबत राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. यांना कळतंय का शस्त्रसंधी आणि युद्धविराम म्हणजे काय. फोडण्याइतके किंवा आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवणे अन् निवडणूक आयोगाला ताब्यात घेऊन पक्ष ताब्यात घेण्याइतके ते सोपं आहे का?. खरंतर, युद्धविराम केलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि युद्धातून आपल्याला खेचलं अन् मोदींना गप्प बसवलं. दरम्यान, टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि त्याठिकाणी अमेरिकेचा झेंडा लावा. अमेरिकेच्या दिनी 4 जून रोजी त्याठिकाणी उत्सव साजरा करा, अशा खोचक शब्दात राऊतांनी शिंदेंच्या शिवेसेनेला डिवचलंय.