नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अजित दादांच्या विमान अपघाताबाबत मंत्र्यांना काहीच माहिती नाहीये. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे. त्यामुळे आम्हाला एका विशिष्ट काल मर्यादेत अपघात संदर्भातील अहवाल पाहिजे. अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
दरम्यान, सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र दुःखातून सावरला असं होत नाही किंवा अपघात विसरला असे होणार नाही. ते राजकारण वेगळ आहे अन् अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भातील आमच्या भूमिका वेगळ्या असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. नवी दिल्लीत ते पत्रकारांसोबत बोलत होते.
‘अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय’ –
अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघात झालेला आहे की तो अपघात कसा आणि का घडलाय, त्या मागचे रहस्य नेमकं काय आहे? हे समजून घेण्याचे अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे लोक माझ्यावर टीका करत आहे. अजित दादांच्या अपघाताबद्दल, मुळात मी शंका घेतलेलीच नाहीये. शंका ही त्यांच्या पक्षातील आमदारांनी तसेच काही नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. मी तो विषय पुढे नेला आहे. कारण, माझ्याकडे देखील काही माहिती प्राप्त झाल्याचे संजय राऊत म्हणाले.
View this post on Instagram
अजित पवारांचा विमान अपघात ‘ऑपरेशन लोटस’चा भाग? –
अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांच्याकडे बरीच कागदपत्रे तयार झाली होती, ज्यामुळे भाजप अस्वस्थ होती. भाजपच्या भ्रष्टाचाराशी संबंधित ठोस पुरावे अजित पवारांकडे होते आणि ते पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच, अजित पवारांचा काही ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून बरं-वाईट तर झालं नाही ना, असं आम्हाला दुर्दैवानं म्हणावसं वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती; पण मोदी, शहा आणि फडणवीस यांचा त्याला अडथळा असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
‘त्यांच्या पक्षावर आता गिधाडं तुटून पडणार’ –
अजित दादांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा महत्वाचे निर्णय घेताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांचा राहिलेला नाही. अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा महाराष्ट्राचा अन् मराठमोळा होता. आता गिधाडं त्या पक्षावर तुटून पडणार आहे आणि त्या पक्षाचे ते लचके तोडणार आहेत.






