ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 14 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. अशोक नारायण चौधरी या सरपंचांचे नाव आहे.
नेमकं काय प्रकरण? –
कळमसरा येथील अशोक चौधरी यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार संजय मधुकर उशीर, ईश्वर कडू पाटील, शेखर श्रीराम चौधरी, संजय कडू ग्यान, रतन रामदास बाविस्कर यांनी केले होती. दरम्यान, सरपंच चौधरी यांच्याविरोधात सुनावणी सुरू होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जि. प. सीईओ, पाचोरा भूमीअभिलेख विभागाचे उपअधीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओंनी सरपंच अशोक चौधरी हे कारवाईस पात्र असल्याचा अहवाल दिला होता.

अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले अपात्र –
दरम्यान, पाचोरा येथील गटविकास अधिकाऱ्यांनी 24.98 चौ.मी. जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दिनांक 12 सप्टेंबर गुरूवार रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल दिला. तक्रारदारांच्या वतीने अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाची माहिती त्यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’सोबत बोलताना दिली.
हेही पाहा : Video : लढाई आमदारकीची : शरद पवार की अजित पवार?, पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची स्फोटक मुलाखत