नागपूर, 14 डिसेंबर : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योग विभागामार्फत सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९, औद्योगिक समूह विकास योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात एमएसएमई व इतर योजनांच्या माध्यमातून उद्योगांना अधिक मदत दिली जाईल, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य भाई जगताप यांनी राज्यातील लघु, मध्यम उद्योगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले, एमएसएमईच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार विविध प्रोत्साहन योजना, सवलती तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या गुंतवणूक मर्यादा वाढवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नेमकं किती कामकाज झालं, संपूर्ण कामकाजाची माहिती एका क्लिकवर…






