• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Crime News : पारोळा तालुक्यातील संतापजनक घटना! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 11, 2023
in पारोळा, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा
प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पारोळा, 11 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. तसेच एरंडोल तालुक्यातील एका आश्रमशाळेतही काही चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या दोन्ही घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

या दोन्ही गंभीर घटना ताज्या असतानाच मात्र, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय संपूर्ण घटना –

नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करुन तिच्या डोक्यावर दगडाने वार करत तसेच दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत पीडित अल्पवयीन मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आरोपीला तत्काळ अटक –

या घटनेनंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तसेच त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन –

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: abuse casecrimeparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page