ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 एप्रिल : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुसाने यांची अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष कुमारस्वामी यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष कुमारस्वामी यांनी नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, ओबीसी बांधवांच्या संघटनासाठी शशिकांत दुसाने यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले. शशिकांत दुसाने यांना दिलेली जबाबदारी ते इमानदारीने व प्रामाणिकपणे सांभाळतील, असा विश्वास कुमारस्वामी यांनी नियुक्तपत्राद्वारे व्यक्त केला. दरम्यान, सर्वसामान्य जनता व ओबीसी समाज बांधवांच्या समस्येसांठी येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शशिकांत दुसाने यांनी सुवर्ण ‘खान्देश लाईव्ह’सोबत बोलताना सांगितले.
कोण आहेत शशिकांत दुसाने? –
शशिकांत दुसाने हे पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच ते प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, मागील काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत शशिकांत दुसाने यांची अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा : ‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा,’ भुसावळे येथे मानवाधिकारचे शशिकांत दुसाने यांचे प्रतिपादन