• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा,’ भुसावळे येथे मानवाधिकारचे शशिकांत दुसाने यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2024
in भुसावळ, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मानवाधिकारचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने उपस्थितांना संबोधित करताना

मानवाधिकारचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने उपस्थितांना संबोधित करताना

भुसावळ, 13 मार्च : मानवाधिकार ही आमची संपुर्ण संघटना समाजात होणाऱ्या अन्यायाविषयी कायम लढत असते आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे आणि ही पण एक समाजसेवाच आहे. यामुळे समाजसेवा हीच ईश्वरसेवा, असे प्रतिपादन मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी केले. यावेळी त्यांनी मानवाधिकाराविषयीचे महत्व सांगितले.

भुसावळात सत्कार संभारभाचे आयोजन –

प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) आणि राजस्थानी विप्र संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने भुसावळ येथे 12 मार्च रोजी सायंकाळी डॉ. साधना देवेंद्र शर्मा यांना गीताव्रती पुरस्कार मिळाल्याबद्दल व अ‍ॅड. निर्मल राजेंद्र दायमा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियक्त झाल्याबद्दल दोघांचा सत्कार संभारभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत दुसाने होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. साधना शर्मा यांचे महत्व विषद करताना दुसाने यांनी सांगितले की, 308 दिवसांत गीताग्रंथ आत्मसात केल्याबद्दल त्यांना गीताव्रती हा पुरस्कार मिळाला. या विषयावर त्यांची एक परीक्षा घेतली गेली. त्यांना 600 पैकी 597 गुण मिळाले. डॉ. साधना शर्मा यांचे वय 68 वर्ष आहे. 50 वर्षे वय ओलांडल्यानंतर माणसाची स्मरणशक्ती कमी होते. परंतु डॉ. साधना यांनी ह्या वयात गीताग्रंथ एवढ्या कमी वेळेत आत्मसात केल्याबद्दल त्यांना गीताव्रती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी विनोद शर्मा यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल दुसाने यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण म्हणाल्या की, महिलांना 50 टक्के आरक्षण असून महिलांना सक्षम होण्याची गरज आहे. मुलांच्या करिअरची जबाबदारी महिलांवर असते, असे बहुतेकांचे मत आहे. तशी जबाबदारी प्रत्येक महिलेने स्विकारली पाहिजे. पालकांनी मुलांशी कायम सुसंवादीत असले पाहिजे. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन सौ. रूपालीताई चव्हाण यांनी केले.

भुसावळ येथील डॉ. साधना देवेंद्र शर्मा यांना गीताव्रती पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि अ‍ॅड. निर्मलजी दायमा यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्काराच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली रजि. भारत सरकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून जगदिश शर्मा, भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण ह्या होत्या. सोबत व्यासपीठावर सत्कारमुर्ती डॉ. साधना शर्मा, डॉ. देवेंद्र शर्मा, राधेश्यामजी लाहोटी, दिनेशजी राठी (नगरसेवक), अ‍ॅड. राजेश अग्रवाल, नेहा दायमा, बबिता शर्मा, कांता शर्मा हे होते.

साधना शर्मा यांनी भगवतगीतेबद्दल महत्व पटवुन दिले. तसेच पुज्य जगदिश शर्मा यांनी भगवतगीतेच्या विचारांची गरज हिंदु धर्माला असल्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा अधीक्षक प्रविण पाटील व जैन विप्र समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बबिता शर्मा यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम राबविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अखिलेश धिमन यांनी तर आभारप्रदर्शन जयप्रकाश शुक्ला यांनी केले.

हेही वाचा : “जीवनात पदे येतात आणि जातात. मात्र…..,” खासदारकीचे तिकिट कापल्यानंतर उन्मेष पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawalhuman rightsShashikant Dusane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page