इंद्रनील भामरे-पाटील, प्रतिनिधी
नगरदेवळा, 16 मे : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे भव्य दिव्य संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरदेवळा येथील ग्रामस्थांनी या कथेचे आयोजन केले आहे.
नगरदेवळा येथे शिवमहापुराण कथा –
नगरदेवळा येथे 15 मे ते 21 मे दरम्यान बाजारपेठे चौकात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा येथील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांच्या वाणीतुन शिवमहापुराण कथा पार पडणार आहे. शिवमहापुराण कथेचे वेळे रात्री साडे आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे. दरम्यान, काल कथेचा पहिला दिवस पार पडला. यावेळी कथेला उपस्थित असलेले ग्रामस्थ भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
ह.भ.प. भागवत महाराज (तबलावादक, नगरदेवळा), ह.भ.प. कुणाल महाराज (सिंध वादक, नगरदेवळा), ह.भ.प. अनुज महाराज (पॅड वादक, पिंपळगाव हरे.), ह.भ.प. अल्केश महाराज (ढोलक वादक, बेलखेडा), ह.भ.प. रविंद्र महाराज (झाकी सजावट, शिंदखेडा) यांची कथेला संगीत संयोजनासाठी साथ लाभणार आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.