ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 ऑक्टोबर : पाचोरा शहरातील एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भवानी नगर भागांतील अनेक शिवसैनिकांनी (शिंदे गट) आज भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांना जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे.
भाजपात पक्षप्रवेश –
शिवसेनेतील (शिंदे गट) प्रदीप पाटील, निलेश मोरे, पिंटू भाऊ पाटील, दिनेश पाटील, रोहित पाटील, शुभम पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, लकी पाटील, सोनू शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार? –
आगामी निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातर्फे एका-पाठोपाठ एक होणारे प्रवेश बघुन पाचोरा शहरांत आपली ताकत वाढविण्यास सुरूवात केल्याचे चर्चिले जात आहे. दरम्यान, येणाऱ्या आगामी काळांत देखील शहरांसह ग्रामीण भागांतील पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी भाजपचे रमेश वाणी, संजय पाटील, दीपक माने, समाधान मुळे, जगदीश पाटील, वीरेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विकी बाविस्कर, भैय्या चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.