ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 सप्टेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाचोरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसैनिकांची आढावा बैठक काल 4 सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील कृषी. उ. बा. समिती समोर, नवकार प्लाझा, गाळा नं 22 येथील शिवसेना संपर्क कार्यालयात संपन्न झाली.
आगमी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक भव्य असा निष्ठावंत शिवसैनिकाचा मेळावा घ्यावा, असा विश्वास सर्व शिवसैनिकांनी वेक्त केला. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघात येणाऱ्या काळात खूप मोठा बदल येणाऱ्या निवडणुकीत होणार आणि विजय सत्याचाच होणार असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रमेश बाफना, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, माजी उपजिल्हा-प्रमुख अॅड. अभय पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पप्पू राजपूत, शहर प्रमुख अनिल सावंत, माजी नगरसेवक दादा चौधरी, युवासेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील, युवासेना उपजिल्हा-प्रमुख शशिकांत पाटील, युवासेना तालुका प्रमुख निखिल भुसारे, युवासेना शहर प्रमुख मनोज चौधरी, उप शहर प्रमुख पप्पू जाधव, उप शहर प्रमुख गजू सावंत, उप शहर प्रमुख अभिषेक खंडेलवाल, उप शहर प्रमुख खंडू सोंनवणे, अशोक पाटील, उप शहर प्रमुक बंडू मोरे, युवासेना गट प्रमुख सचिन पाटील, जयसिंग परदेशीं, विलास पाटील, भागवत पाटील चिंचपुरा, आनंदा मागो पाटील, यशवंत पाटील, अकील शेख, सलीम खान युसुफ खान, अशोक गोपाळ, सीताराम गायकवाड, अरुण भगवान खेडकर, समाधान पुंडलिक हटकर, गोकुळसिंग गागुर्डे, पितांबर मिस्त्री, राजेंद्र भगवान पाटील, शरीफ शेख मुसा, शंकर पाटील, कार्यालय प्रमुख अरुण तांबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.