• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘देशात लाखो तरुण बेरोजगार, त्यांनाही….’, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्यावरुन संजय राऊंताची जोरदार टीका

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 25, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
sanjay raut criticize pm modi jalgaon visit

पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्यावरुन संजय राऊंताची जोरदार टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत. लखपती दीदी हे निमित्त आहे. या देशात लाखो तरुण बेरोजगार, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. ते युक्रेन, पोलंड, रशिया येथेही भाजपच्या प्रचाराला गेले होते आता जळगावालाही त्याच कार्यक्रमासाठी आले आहेत. लखपती दीदी हे निमित्त आहे. या देशात लाखो तरुण बेरोजगार, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे, या शब्दात त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

महिलांना सुरक्षा द्या –

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात महिला सुरक्षेसाठी आंदोलन केले जात आहे. त्याबाबत पंतप्रधान काहीच नाहीच बोलले. ज्या जळगावला पंतप्रधान येत आहेत, तिथे 15 दिवसात 4 महिलांवर अत्याचार झाले. 1 मुलगी आहे. 1 दिव्यांग आहे. कुणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगायला हवं, तुम्ही कुणाला लखपती बनवत आहात. आधी आपल्या दीदींना सुरक्षा द्या. त्याबाबत कुणीच बोलत नाही. पंतप्रधान येतील, आणि दुसऱ्या जागी जातील. फक्त फिरत राहतील आणि आमच्या दीदी या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात न्यायासाठी फिरत राहतील. मग पोलीस ठाणे त्यांची एफआयआर घेणार नाही. मग जनता आंदोलन करेन. मग कुणी न्यायालयात जाईल आणि आंदोलनावर बंदी आणेल, अशा शब्दात त्यांनी जोरदार निशाणा साधला.

मोदींचा जळगाव दौरा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 25 ऑगस्ट रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन 11 लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत. पंतप्रधान 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ 4.3 लाख बचत गटातील सुमारे 48 लाख सदस्यांना होईल, असे सांगण्यात आले आहे.

‘जळगाव येथे जाण्यास मी…’, दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत केल्या व्यक्त भावना, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mp sanjay rautnarendra modinarendra modi jalgaonnarendra modi jalgaon newspm narendra modi latest newssanjay raut latest news]

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page