• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘…हा महादजी शिंदे यांचा अपमान’, संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर, म्हणाले…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
shivsena-ubt-mp-sanjay-raut-given-reply-to-union-minister-jyotiraditya-scindia-over-his-comment-know-in-detail

'...हा महादजी शिंदे यांचा अपमान', संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर, म्हणाले...

नवी दिल्ली – वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे, या शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्लीत महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. माध्यमांच्या प्रश्नांवर संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे का कुणी दिला आहे हा पुरस्कार, अशाप्रकारे राजकारण्यांना देण्यात येणारे पुरस्कार हे खरेदी केले जातात किंवा विक्री केले जातात.

काय म्हणाले होते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया –

संजय राऊत यांच्या या टीकेवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते की, ‘मराठा समाज सर्व काही पाहतोय! बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श नाकारून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करून मराठा सन्मान कसा समजणार? ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला आधार आणि आदर गमावला आहे ते इतरांच्या आदराने त्रस्त आहेत,’ या शब्दात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संजय राऊतांना टोला लगावला होता. यावर आता पुन्हा संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत –

‘Great!, महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले नाही!’, या शब्दात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहित संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – maharashtra politics : सत्कार एकनाथ शिंदेंचा, राऊतांची शरद पवारांवर टिका, महाविकास आघाडीमध्ये घमासान, कोण काय म्हणालं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindeJyotiraditya Scindiamaharashtra political newsmaharashtra politicsmaharashtra sadansanjay raut

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page