जळगाव, 14 जून : जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचानामे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय. याबाबतचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसदर्भातील मागण्या पुर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्यात यईल, असा इशारा शिवसेना उबाठाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी दिलाय. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
गुलाबराव वाघ काय म्हणाले? –
शिवसेना उबाठाच्यावतीने निवदेन देण्यात आल्यानंतर गुलाबराव वाघ पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात 11 जून रोजी रात्री वादळी पाऊस झाला. यामध्ये केळी बागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती.
“….अन्यथा चक्काजाम आंदोलन करणार!” –
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जळगावच्या सभेत घोषणा केली होती. तसेच लाडक्या बहिणींच्या 2100 रूपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले होते. मात्र, त्यावेळी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना अद्यापर्यंत ते अनुदान देण्यात आलेले नाहीये.
यामुळे शेतकऱ्यांसंदर्भातील अशा तीन-चार मागण्या महायुती सरकाने पुर्ण कराव्यात, यासाठी शिवसेना उबाठाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आलेले आहे. दरम्यान, महायुती सरकारने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भात निर्णय न घेतल्यास येत्या आठ दिवसानंतर शिवसेना उबाठाच्यावतीने जळगाव जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुलाबराव वाघ यांनी दिलाय.
यांची होती उपस्थिती –
यावेळी शिवसेना उबाठाचे जळगाव जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, वैशाली सुर्यवंशी, महानगर प्रमुख शरद तायडे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महानगर समन्वयक संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, विभाग प्रमुख किरण भावसार, विजय बांदल, सतीश मोरे, दीपक पवार, छोटु कोळी, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड, आदी उपस्थित होते.