• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले की, “मी स्वतः लक्ष घालून….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले की, “मी स्वतः लक्ष घालून….”

जळगाव, 14 जून : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पंचनामे करण्यात आले असून उरर्वित पंचानामे देखील लवकरात लवकर केले जातील आणि त्यांनंतर नियमानुसार मदत शेतकऱ्यांना तात्काळ दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत मदत मिळण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आढावा –

जळगाव जिल्ह्यात बुधवार 11 जून रोजी रात्री झालेल्या वादळी पावसमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात केळी, मोसंबी, पपई तसेच लिंबू बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आल्यानंतर नुकसानीबाबतचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.

गिरीश महाजन काय म्हणाले?-

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात परवाच्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगदी चक्रीवादळासारखा हा पाऊस होता. यामुळे केळी, मोसंबी तसेच लिंबूच्या बागा ह्या मुळापासून निघाल्या आहेत. तर काही ठिकाणी शेकडो घरांची पत्रे उडाली आहेत. वीजेचे पोल तसेच तारांचे देखील वादळामुळे नुकसान झालंय. यासंदर्भात प्रशासनाकडून आढावा घेतलाय.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचानामा केलाय. आता नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. जळगाव जिल्ह्यात वादळी पावसात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाईकांना देखील नियमानुसार मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.


विमान अपघाताताबाबत काय म्हणाले? –

अमदाबाद विमान अपघाताबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, विमान अपघाताची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अहमदाबादहून लंडनला हे विमान निघाले होते. या विमानात सव्वा लाख इंधन भरले होते आणि विमान जमीनदोस्त होऊन मोठा स्फोट त्यावेळी झाला.  यामध्ये विमानातील प्रवाशी तसेच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील 270 जणांना आपला जीव गमावावा लागलाय.  खरंतर, कुठल्या शब्दात संवेदना व्यक्त कराव्यात हे कळत नाही. पण दुर्दैवाने ते आपल्यात नसून त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो. दरम्यान, विरोधकांना कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्याने ते सरकारविरोधात वक्तव्य करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

हेही वाचा : पाचोरा-भडगाव तालुक्यात वादळी पावसामुळे केळीबागांचे नुकसान; आमदार-खासदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

बातमी शेअर करा !
Share
Tags: crop lossdamagejalgaon newsminister girish mahajanstormy rainssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page