ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 एप्रिल : पाचोऱ्यात कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तालुक्याच्यावतीने प्रभु श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीराम नवमीनिमित्त पाचोरा येथील जुने पुरातन काळातील श्रीरामाचे मंदिर असून सालाबादाप्रमाणे यावर्षीही कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा यांच्यातर्फे बुंदी वाटप करून सर्वांना बुंदीचा प्रसाद देण्यात आला. शहरातील नागरिकांनी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत आरती व जयघोष करून आनंद साजरा केला. यावेळी जुने श्रीराम मंदिरात प्रचंड गर्दी होती.
यावेळी कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा यांच्यातर्फे 100 किलो बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने, पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके, निवासी नायब तहसीलदार विनोद बबन कुमावत, पो.हे.कॉ. रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच कुमावत बेलदार समाज बांधव व माता-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य (संस्थापक अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम (अण्णा) दगडू कुमावत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दिनकर कुमावत, सचिव अनिल रामसिंग बेलदार, सहसचिव योगेश चंद्रभान कुमावत, कोषाध्यक्ष दिलीप ओंकार कुमावत, सल्लागार नाना माणिक कुमावत, सल्लागार नाना माणिक कुमावत, सदस्य निलेश लक्ष्मण कुमावत, शरद किसन कुमावत सर, शालिक दगडू कुमावत, नारायण निवृत्ती कुमावत सर,युवराज कुमावत, राजू प्रधान कुमावत, पुंडलिक नारायण कुमावत, नानुराम दगडू कुमावत सर, पुरुषोत्तम कुमावत, जितेंद्र शंकर कुमावत, अल्पेश नाना कुमावत,किशोर नाना कुमावत, गं.भा. मंगलाबाई शंकर कुमावत, कलाबाई नाना कुमावत, पल्लवी अल्पेश कुमावत, निकीता किशोर कुमावत, कविता दिलीप कुमावत, मिनाबाई शरद कुमावत आदींनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हेही वाचा : Video : ‘नाथाभाऊला का पुरावे मागत असतात?’ एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांना सवाल, नेमकी बातमी काय?