• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 1, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 1 जून: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आज 1 जून रोजी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. दिवसभरात एकूण 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे ही निवडणूक रंगतदार मोडवर आली आहे.

भाजपकडून नंदकिशोर महाजन मैदानात –

भारतीय जनता पक्षाच्यावतीने काल रात्री उशिराने नंदकिशोर भागवत महाजन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज भरताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार स्मिता वाघ तसेच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुलाबराव पाटलांच्या पुत्राची माघार –

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे राजकीय गणिते बदलली. एकीकडे, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता, महायुतीचा धर्म पाळत वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे बंड –

शिवसेना शिंदे गटाकडून कोणत्याही पुरुष उमेदवाराने अर्ज भरलेला नसताना, महिला आघाडीने मात्र पक्षश्रेष्ठींना आव्हान देणारे वेगळे पाऊल उचलले. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे, हा अर्ज भरताना पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा करण्यात आलेली नव्हती. “महिलांना विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसून पक्ष यावर जी काही कारवाई करेल त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे,” असे सरिता माळी-कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

तसेच भुसावळ येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महाविकास आघाडीकडून शरद तायडे रिंगणात; निलेश चौधरींचे आव्हान

महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला आला आहे. पक्षाने विश्वास दाखवल्यानुसार शरद शामराव तायडे यांनी आज आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले. धरणगावच्या नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांचे पुत्र निलेश चौधरी यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना जाहीर आव्हान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरही आता बंडखोरी शमवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

यासोबतच, महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षालाही अंतर्गत बंडखोरीचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी यांनी देखील पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

अनिल चौधरींचा उमेदवारी अर्ज दाखल –

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये ‘प्रहार’ पक्षानेही निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री केली आहे. प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे लढतीमधील चुरस आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

माघारीनंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार –

जळगाव जिल्ह्यात महायुतीचं प्राबल्य आहे. असं असतानाही जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही निवडणूक आता केवळ दोन आघाड्यांमधील थेट लढत राहिलेली नाही. दोन्ही बाजूंनी अंतर्गत बंडखोरी झाल्याचे दिसून येत असताना तब्बल 14 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 4 जूनपर्यंत नेमकं कोणता उमेदवार माघार घेणार आणि विधानपरिषद निवडणुकीत जळगावची जागा जिंकून आणण्यासाठी भाजप नेते राजकीय समीकरण कशी जुळवून आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे –
  1. प्रविण गंगाराम पाटील – अपक्ष
  2. निलेश सुरेश चौधरी – अपक्ष
  3. आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद – अपक्ष
  4. सुनिल नेमिदास जंगले – अपक्ष
  5. शेख दानिश शेख निसार – अपक्ष
  6. जावेद इकबाल अब्दुल रशीद – अपक्ष
  7. नंदकिशोर भागवत महाजन – भाजप
  8. शरद शामराव तायडे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  9. सचिन संतोषभाऊ चौधरी – अपक्ष
  10. अनिल छबिलास चौधरी – अपक्ष
  11. रेमा कुंदन काळे – अपक्ष
  12. दिपक काशिनाथ धांडे – अपक्ष
  13. निलेश गणेश झोपे – अपक्ष
  14. कत्लीमखान हैदरखान मनियार – अपक्ष
  15. हितेंद्र रमेश देशमुख – अपक्ष
  16. घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील – अपक्ष

हेही वाचा: IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा 5 गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsnominationssuvarna khandesh livevidhan parishad election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

June 1, 2026
जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page