मोराणे (धुळे), 22 मार्च : धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नवीन मतदान नोंदणी व मतदानाचे महत्व मोराणे गावातील नागरिकांना पटवून सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे मतदान नोंदणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना नवीन मतदान नोंदणी करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
महाविद्यायचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ व प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी समाजातील सर्व उपेक्षित आणि तळागाळातील लोकांना मतदानाचे महत्व समजेल आणि ते देत असलेल्या मताचे महत्व त्यांना समजेल म्हणून सर्व युवकांना जनजागृती करण्यासाठी आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ तसेच प्रा.डॉ. गोपाल निंबाळकर आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोराणे गावात मतदान जनजागृती विषयी रॅली व पथनाट्य सादर करून जनजागृती करत रॅली काढण्यात आली. यावेळी मतदानाच्या जनजागृतीसाठी घोषणा देण्यात आले.
मोराणे गावात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला. मतदान संदर्भात असलेल्या वोटर हेल्पलाईन ऍप्सच्या माध्यमातून युवक मोफत मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले. समाजातील युवक, महिला, पुरूष आणि दिव्यांग वर्गांने मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे देखील पथनाटाच्या माध्यमातून सांगण्यात आले. पथनाट्य पाहण्यासाठी मोराणे गावातील वृद्ध, युवक, महिला वर्ग देखील त्याठिकाणी उपस्थित होते. तसेच मतदान जनजागृती रॅलीत एम. एस. डब्ल्यूचे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसह मोराणे गावातील वृद्ध, युवक, महिलावर्ग उपस्थित होते.
हेही वाचा : Special Story : जळगाव जिल्ह्यातील श्रृतीची अभिमानास्पद कामगिरी, पहिल्याच प्रयत्नात MES परिक्षेत उत्तीर्ण