पाचोरा, 25 मार्च : नुकतीच सर्वत्र स्वामी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावातही स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तब्बल 12 वर्षांची परंपरा –
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सातगाव डोंगरी दिंडोरी प्रणित येथे तब्बल 12 वर्षांपासून स्वामी जयंती उत्सव मोठ्या आनंदाने सेवेकरी वर्ग साजरा करतात. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये माता भगिनी तसेच पुरुष सेवेकरी बालगोपाल सहभागी होतात. तसेच संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात येते.
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.#swamisamarth #satgaondongri #pachoranews pic.twitter.com/ft2HZDbkBa
— suvarnakhandeshlivenews (@suvarnakhandesh) March 25, 2023
या वर्षीही मोठ्या आनंदात आणि उत्साहात मिरवणूक व पालखी काढण्यात आली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास सेवेकरी यांनी स्वामी चरित्र हवन यांनी केले. तसेच स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. पाचोरा तालुका अध्यक्ष भाजपा अमोल शिंदे, गजानन लाधे यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. तसेच या आरतीसाठी खूप मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.
आरतीनंतर कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी केंद्र प्रतिनिधी नामदेव पवार, गजानन भाऊ लादे, भागवत भाऊ, भुषण वाघ, सुदाम भाऊ, यशोदा आजी, ईश्वर परदेशी, दिनेश परदेशी व सेवेकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.