जळगाव, 29 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 सुरू झाला आहे. यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीयस्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे.
याबाबत येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या क्रमांकावर साधता येणार संपर्क –
या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर 8983839468, कार्यालयीन संपर्क क्रमांक 0257-2239054 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेलद्वारे पाठवता/नोंदवता येणार आहे.
हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात अवकाळीने मोठं नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?
जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रार निवारण कक्षात अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव मो. क्र. 8983839468, संतोष भावसार- वरिष्ठ लिपीक- मो. क्र. 8983839468, समाधान देवरे- कृषि सहाय्यक- मो. क्र. 8983839468 या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.