• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

ट्रेसर्स असोसिएशन कृषी खाते महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण महोत्सवी बारावे राज्यव्यापी अधिवेशन संप्पन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2026
in ताज्या बातम्या
ट्रेसर्स असोसिएशन कृषी खाते महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण महोत्सवी बारावे राज्यव्यापी अधिवेशन संप्पन्न

चोपडा/परभणी, 25 जानेवारी : परभणी येथे बहुचर्चित खूप वर्षापासून प्रलंबित असलेले अनुरेखक बांधवांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक झाल्यानंतर अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अनुरेखकांच्या संघटनेने अखेर परभणी येथे ट्रेसर्स असोसिएशन कृषी खाते महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण महोत्सवी बारावे राज्यव्यापी अधिवेशन शानदार थाटामाठात संपन्न झाले.

सदरील अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.रावसाहेब राऊत, परभणीचे उप विभागीय कृषी अधिकारी पंडितराव बरदाळे तसेच जीनियस इंग्लिश स्कूल परभणीचे प्राचार्य काशिनाथ सालमोठे, ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस जयप्रकाश कामडी, कोषाध्यक्ष विलास पोवार व मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर  हे उपस्थित होते.

सर्वप्रथम अधिवेशनाचे उद्घाटन उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. त्यानंतर भारतातील जे थोर नेते,संशोधक, शास्त्रज्ञ, साहित्यिक, सीमेवरील जवान, कलावंत, शिक्षण तज्ञ, कार्यकर्ते, संस्थेचे हितचिंतक, संस्थेचे सभासद इत्यादीचे दुःखद निधन झाले त्यां सर्वाना  उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे पदाधिकारी,सदस्य अनुरेखक परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमानंतर सांगली येथील गायक अनुरेखक यांनी अतिशय सुंदर आवाजात  स्वागत गीत सादर केले व यांचे नंतर संघटनेचे कोषाध्यक्ष विलास पोवार कोल्हापूर यांनी अतिशय उत्कृष्ट अतिशय प्रभावी पहाडी आवाजात उत्कृष्ट गायकीच्या  शैलीमध्ये महाराष्ट्र राज्य गीत सादर करीत सर्व प्रेक्षकांची पाहुण्यांचे लक्ष आकर्षित केले.

स्वागत गीतानंतर मंचावरील उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष  व्यंकटेश हालिंगे, मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर, संघटनेचे कोषाध्यक्ष विलास पोवार, सरचिटणीस जयप्रकाश कांमडी, संघटनेचे सहसंयोजक आर आर बनपुरे, दुसरे सहसंयोजक नंदकुमार परांडकर परभणीचे जिल्हा अध्यक्ष  हिरालाल बंडे, संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष केशव मदनकर, उपाध्यक्ष यशवंत जडे, महिला प्रतिनिधी सौ. अश्विनी कोळेकर, विभागीय सचिव आर. एम.चव्हाण, विभागीय सचिव प्रकाश कडू, विभागीय सचिव सत्यजित कोमनाक, विभागीय सचिव किशोर शास्त्रकार, विभागीय सचिव किरण पाटील, इत्यादींनी सर्व पाहुण्यांचा, शॉल पुष्पहार श्रीफळ संघटनेचे स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार सोहळा संपन्न केला.

त्यासोबतच अतिशय उत्कृष्ट अधिवेशनाचे आयोजन केल्याबाबत मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर, व सौ कुसुम क्षीरसागर, हिरालाल बंडे व  बंडे, आर.आर. बनपुरे सौ बनपुरे, नंदकुमार परांडकर, विलास पोवार, जयप्रकाश कांमडी, यशवंत जडे इत्यादींचा ही याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.

यानंतर संघटनेचे सदस्य व व्यंग चित्रकार दगडू वाहूर वाघ यांचाही सपत्नीक शाल पुष्पहार श्रीफळ व संघटनेची प्रतिमा व व्यंगचित्र क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल गौरव प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. या सोबतच संघटनेतील सदस्य व अनुरेखक यांनी शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पदोन्नती प्राप्त करत अधिकारी पदावरती विराजमान होऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी अण्णाराव भुसने लातूर व सांगलीचे अनुरेखक यांचा व लातूरचे आय एस ठाकूर यांनी  सेवा निवृत्तीनंतर एल आय सी च्या क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचीं MDRT या अमेरिकेच्या क्लबचे ते सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व एल आय सी च्या क्षेत्रात टॉप अभिकर्ता म्हणून कार्यरत राहुन अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यानंतर ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य अधिवेशनात संदर्भात अनुबंध स्मरणिकेचे संपादन लेखन रचनाबद्ध जुळवणी व छपाई करून वेळेत स्मरणिका प्रकशीत व विमोचन करण्यासाठी संघटनेचे विभागीय सचिव  प्रकाश कडू यांनी परिश्रमपूर्वक अतिशय उत्कृष्ट स्मरणिका तयार केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाश कडू यांचा ही सत्कार करण्यात आला.

यानंतर संघटनेचे सदस्य व व्यंगचित्रकार दगडू वाहूर वाघ व संघटनेचे विभागीय सचिव किशोर शास्त्रकार यांनी अनुवैभव त्रैमासिक पत्रिका यशस्वी लेखन संपादन व छपाई करून प्रसिद्ध करून काही काळ यशस्वी चालवल्या बद्दल यांचाही सपत्नीक शाल पुष्पहार श्रीफळ व संघटनेची प्रतिमा व व्यंगचित्र क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल गौरव प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. सदरील आयोजित कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस जयप्रकाश कामडी नागपूर यानी केले व यानंतर मा. काशिनाथ सालमोठे सर अध्यक्ष तथा प्रिन्सिपल जीनियस इंग्लिश स्कूल परभणी, यांनी अधिवेशनास उपस्थिताना मार्गदर्शनपर भाषण केले.यांच्या नंतर मा.पंडितराव बरदाळे साहेब सेवानिवृत्त उप विभागीय कृषी अधिकारी परभणी यांनी देखील अतिशय चौफेर अनुरेखका विषयी त्यांच्या कामगिरी बद्दल व त्यांचे आवश्यकते बाबत आणि संघटनेच्या उल्लेखनीय कामगिरी संदर्भात अतिशय सुंदर मार्गदर्शन केले याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सदरील अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी लातूर विभागाचे विभागीय सचिव श्री नंदकुमार परांडकर, परभणी जिल्ह्याचे हिरालाल बंडे, परभणी जिल्हा संघटनेचे सदस्य सर्वश्री गजानन खपले,अविनाश कुरुडे,जगन्नाथ पवार,मोहीयोद्दीन,एस.एस.धर्मशेट्टी, नंदकुमार परांडकर,श्री नारायण कदम, ईत्यादी अनुरेखक बांधवांनी अतिशय परिश्रम घेतले. सर्व उपस्थित पाहुण्यांचे प्रति अधिवेशन संयोजक अंबादास क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाल्याबद्दल सर्व उपस्थित सहकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 | किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculture departmentconventionparbhani newssuvarna khandesh livetracers association

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page