चाळीसगाव, 16 ऑगस्ट : नार पार योजना केंद्र सरकारच्या निधीतून प्रशासकीय मान्यतेची तरतूद करावी, या मागणीसाठी गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी आज शेकडो ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले. नार पार द्या अन्यथा राज्य सरकारला हद्दपार करू तसेच गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली असून येत्या शुक्रवारी अर्धनग्न आंदोलन करु, असा इशारा माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी दिला आहे.
नारपार योजना ही गिरण्या खोऱ्याच्या समृद्धीसाठी महत्त्वाची योजना असून केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी गुजरातकडे पाणी वळविण्याच्या हेतूने हा प्रकल्प नाकारला आहे. ही भूमिका गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका असून राज्यपालांचे पत्र हा फडणवीस यांचा निवडणूक जुमला असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा –
आज नार पार गिरणा खोरे बचाव कृती समिती खान्देशच्यावतीने शेकडो ट्रॅक्टर घेऊन प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. दुपारी बारा वाजता मार्केट कमिटी पासुन निघालेला हा मोर्चा तीन वाजता नविन प्रशासकीय इमारतीत पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे यासारख्या घोषणा देऊन चाळीसगाव दणाणून सोडले. यावेळी तिरंगा झेंडा लावून निघालेले ट्रॅक्टर मोर्चाने शहराचे लक्ष वेधले. नवीन प्रशासकीय इमारतीत मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पांझण डावा कालवा कृती समिती अध्यक्ष अॅड. राजेंद्र सोनवणे यांनी या ट्रॅक्टर मोर्चाची भूमिका मांडली.
यानंतर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. राहुल जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे गोकुळ पाटील सर ,जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, प्रगतिशील शेतकरी नरेश साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती साहेबराव चव्हाण, राष्ट्रवादीचे सतीश दराडे ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरणा खोरे बचाव समितीचे पप्पू रणदिवे यांनी केले तर आभार अॅड. राजेंद्र सोनवणे यांनी मानले.
येत्या शुक्रवारी अर्ध नग्न आंदोलन –
नारपारचे पाणी आमच्या हक्काचे होते. त्यात 19 टीएमसी पाणी देण्याची तरतूद होती. हे पाणी गिरणा खोऱ्यात आल्याने येथील शेतकऱ्यांच्या शास्वत विकासाला चालना मिळणार होती.पुढच्या पिढ्यांना सिंचनाची सुबत्ता मिळणार होती.नारपार प्रकल्प केंद्र सरकारच्या योजनातून किंवा नदीजोड प्रकल्पात समावेश करुन प्रशासकीय मान्यता मिळावी. असे असताना माञ गुजरात धार्जिणे केंद्र सरकारने परवानगी नाकारली तरी देखील राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. ही बाब खान्देशवासियांसाठी दुःखाची असून गिरणा खोऱ्यातील गावांमधील असंतोष निर्माण असून येत्या आठवड्यात हजारो शेतकरी गिरणेच्या पाण्यात अर्धनग्न आंदोलन करतील, असा इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख दिनेश पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अनिल निकम, काँग्रेसचे शहर प्रमुख रवी जाधव, राष्ट्रवादी शहर प्रमुख श्यामभाऊ देशमुख,आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष राहुल सिंग पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गौतम सोनवणे, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर ठाकरे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे,नगरसेवक भगवान पाटील, जि.प.सदस्य भूषण पाटील, सुभाष पाटील, प्रताप पाटील, माजी नगरसेवक बबलू बाविस्कर, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, पं.स सदस्य संजय पाटील,हिम्मत निकम, नाना शिंदे,आशिष सानप,अनिल राठोड, महेंद्र जयस्वाल, शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, अशोक पाटील, यांच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख सविताताई कुमावत, कविता साळवे, सुलताना बेग, श्रीमती पवार, उज्वलाताई जगदाने, रोहित जाधव,विनायक मांडोळे, नाना तांबे, गणेश पवार,प्रल्हाद साबळे, संदीप मांडोळे, दीपक एरंडे, उमेश एरंडे, लक्ष्मण पवार, विकास गवळी, नामदेव तांबे, दिनकर जाधव,चेतन कुमावत, ए व्ही तात्या पाटील,अर्जुन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, रविभाऊ पोळ, मोहित भोसले, भाऊसाहेब केदार, शिवाजी सोनवणे, शुभम पवार, गौरव पाटील, राजीव जाट ,दीपक राजपूत, विकास पाटील, सुशील आमले,हृदय देशमुख, नरेश साळुंखे, सारंग जाधव, सौरव पाटील, पप्पू राजपूत, मुकेश गोसावी, भाऊसाहेब पाटील, रवीभाऊ चौधरी, आनंदा पाटील, नरेन काका जैन, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील,अमित सुराणा,आर.जी.पाटील,समकीत छाजेड, अनिल चव्हाण, किशोर पाटील सौरव पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत