मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 20 मे : चोपडा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोपडा शहरातअचानक ब्रेक फेल झालेल्या बसने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे मयताचे नाव आहे. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष रा.चुंचाळे ता. चोपडा ) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष रा. बारगन अळी ता. चोपडा) अपघातातील मृतांची नावे आहेत. तसेच इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, लासूरकडून चोपडा आगारात येत असलेल्या बसचे चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी शहरात (क्र MH 40, N9828) बसचे ब्रेक फेल झाले. दरम्यान, भरधाव वेगाने येत असलेल्या बसने एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. यामध्ये सानू रशीद पठाण हा जागीच ठार झाला तर रविंद्र बहारे यांना गंभीर अवस्थेत चोपडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. इतर दोन जण अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बस अपघाताच्या घटनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलत तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट देत पाहणी केली तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पुढील प्रक्रिया चोपडा पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, चोपड्यातील बसचे ब्रेक फेल झाले अन् या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.