• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील’, माजी मंत्री बच्चू कडूंचा दावा, नेमकी काय बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील’, माजी मंत्री बच्चू कडूंचा दावा, नेमकी काय बातमी?

मुंबई, 22 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने स्थापन झालंय. असे असले तरी महायुती-महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकीय वातावरण तापलंय. अशातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

नेमकी काय बातमी? –
बच्चू माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपाबरोबर अडकून राहिले आहेत. मात्र, त्या दोन ते तीन विधेयकांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे. दरम्यान, यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता टाळता येत नाही, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर –
बच्चू कडू यांच्या विधानावर महायुती सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत. मात्र, त्याचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचे आडनाव कडू आहे गोड नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे हास्यास्पद विधान करू नये”, असं म्हणत आशिष शेलार यांनी बच्चू कडू यांच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव –
अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभूत झाले. भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा दारूण पराभव केला. बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान, मंत्री असतानाही त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत गुवाहाटीला जाणे पसंत केले होते. यानंतर त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी छत्रपती संभाजीराजे तसेच राजू शेट्टी यांनी सोबत घेत महायुती व महाविकास आघाडीच्याविरोधात परिवर्तन महाशक्तीची आघाडी उभी केली होती. याचाच फटका त्यांना या विधानसभा निवडणुकीत बसला असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले अमोल शिंदेंचे अभिनंदन!, काय म्हणाले?…

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kadubjpmarathi newssharad pawarsuvarna khandesh live newsuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
शिक्षण हे परिस्थिती बदलविण्याचे प्रभावी माध्यम; शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा उपयोग करून घेणे गरजेचे – गणेश शिंदे

शिक्षण हे परिस्थिती बदलविण्याचे प्रभावी माध्यम; शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा उपयोग करून घेणे गरजेचे – गणेश शिंदे

March 23, 2026
निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

March 21, 2026
मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

March 21, 2026
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

March 21, 2026
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page