जळगाव, 21 नोव्हेंबर : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी काल सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करत आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील एकूण मतदानाची आकडेवारी समोर आली असून 65.77 टक्के इतके मतदान झाले.
जळगाव जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी –
जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात एकूण 65.77 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक रावेर विधानसभा मतदारसंघात 73.84 टक्के इतके तर सर्वाधिक कमी मतदान जळगाव शहर मतदारनसंघात 54.95 इतके झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी –
जळगाव जिल्ह्यात एकूण मतदारांची 36 लाख 78 हजार 112 इतकी आहे. यापैकी एकूण 24 लाख 18 हजार 991 मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला. यामध्ये 12 लाख 48 हजार 940 पुरूष तर 11 लाख 70 हजार 7 स्त्री तसेच इतर 44 मतदार यांनी मतदान केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात एकूण 65.77 टक्के इतके मतदान झाले.
वेबकास्टिंगवरून नियंत्रण –
11 विधानसभा मतदार संघात एकूण 3683 मतदान केंद्र पैकी 2965 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात आले, म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक मतदान केंद्रातून वेबकास्टिंग करण्यात आली. राज्यात सर्वाधिक वेबकास्टिंग जळगाव जिल्ह्यात करण्यात आली. याचे नियंत्रण अल्पबचत भवन मध्ये करण्यात आले. या ठिकाणी जिल्हानिवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवडणूक आयोगाच्या सामान्य निरीक्षक यांचे बारकाईने लक्ष देऊन त्रुटी दुर केल्या.
सी व्हिजील अँपवरील संपूर्ण तक्रारीचे निवारण –
सी व्हिजील या ॲपवर एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या तर जिल्ह्यातील 1950 कॉल सेंटरवर 879 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल अँप कार्यान्वित करण्यात आले होते. या ॲप वर विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाशी संबंधित तक्रारी प्राप्त होत होत्या. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून एकूण 275 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या.
हेही वाचा : Special Report : आज मतदान, जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमधील लढती वाचा एका क्लिकवर