ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 जानेवारी : राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे शिवसेनेतील दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जात असतानाच पाचोरा-भडगाव मतदारसंघात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी देखील गावोगावी शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला आहे.
काय संपूर्ण बातमी –
पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत मैदानात उतरलेल्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गावोगावी शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला आहे. दरम्यान, त्यांनी दुसखेडा, वडगाव खुर्द, हडसन व मोहाडी, पहाण, आसनखेडा, नांद्रा या गावांमध्ये नवीन शाखांचे उदघाटन केले.
गाव तिथे शाखा –
पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांनी तगडे आव्हान उभे करतांना जनसामान्यांशी थेट संपर्क सुरू करतांनाच गाव तिथे शाखा हा उपक्रम सुरू केला आहे. याच्या अंतर्गत आजवर 70 पेक्षा जास्त शाखांचा शुभारंभ करण्यात आला आहे. वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या दुसखेडा, वडगाव खुर्द, हडसन व मोहाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक पहाण व आसनखेडा गावात प्रत्येकी दोन तर नांद्रा गावात तीन शाखांचा शुभारंभ केला.
काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी? –
शाखांचे उद्घाटन करताना वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, शाखा हा आपल्या पक्षाचा आत्मा असून याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे तसेच आगामी काळातील निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज रहावे. प्रत्येक शाखेच्या पदाधिकार्यांनी परिसरातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याला आपले आद्य कर्तव्य समजावे असेही त्या म्हणाल्या. तर, आगामी काळात याच शाखांच्या माध्यमातून जनहिताची कामे करण्यात येतील, असे प्रतिपादन देखील केले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख, उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजीव काळे परधाडे; सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, खेडगाव नंदीचे सचिन पाटील, मुन्ना संघवी, अशोक पितांबर पाटील, श्रीराम ढमाले, किरण पाटील, हडसन येथील देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन, संजय ठाकरे, अशोक महाजन, एकनाथ महाराज, आप्पा पाटील, विनोद आप्पा बाविस्कर नांद्रा, आनंदा पाटील नांद्रा, राजू भैय्या, रवींद्र पोपट पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हेमराज पाटील, समाधान पाटील, गफार भाई, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल यांच्यासह समस्त ग्रामस्थ व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा, पाचोरा शहर भाजपच्यावतीने महत्वाची मागणी