जळगाव, 27 जानेवारी : संपूर्ण देशात काल 74 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या याच औचित्यावर काल जळगाव येथे “वंदे मातरम उत्सव तीन रंगांचा देशासाठी फक्त 52 सेकंद” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनी जिथे असाल तिथे थांबूया आणि एकाच वेळी आपल्या जवळच्या चौकात राष्ट्रगीत म्हणूया, अशी या कार्यक्रमाची थीम होती. यानुसार यावेळी भारत मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले. लोकमत आणि जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
हेही वाचा – जळगाव : डॉ. नयना महाजन यांची डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी नियुक्ती
कोण कोण होतं उपस्थित –
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे अधीक्षक रविंद्र ठाकुर, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या डॉ. नयना झोपे, मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. कुमावत, जीवनज्योती व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष बाळासाहेब कुमावत, बाराबलुतेदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर, जळगाव शहर अध्यक्ष (बाराबलुतेदार महासंघ) चंद्रशेखर कापडे, ज्ञानभारती फाऊंडेशनच्या अॅड. भारती कुमावत, योगीता सैंदाने, मोनिका कुमावत आदी उपस्थित होते.