मुंबई, 6 एप्रिल : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशातच आज एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा मंत्री महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. दरम्यान, यावर मंत्री महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया देत खडसेंना जोरदार आव्हान दिलंय.
एकनाथ खडसे काय म्हणाले होते? –
एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या गौप्यस्फोटाचा संदर्भ देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाराजांनाच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली असून त्यात गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत, असे त्या पत्रकाराने सांगितले आहे. दरम्यान, या आरोपांसंदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही खडसे म्हणाले होते. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय.
View this post on Instagram
मंत्री गिरीश यांची संतप्त प्रतिक्रिया –
मला वाटतं की, कंबरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना काही दुसरं जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट हे महाराष्ट्राला माहितीये. यामुळे त्यांच्याइतकं खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलयचं असेल तर मी त्यांच्याबद्दल इतकं बोलू शकतो की, त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. त्यांचं आता सगळं संपलं असून वाटेल तशी ते भाषा बोलतात. यामुळे अख्या महाराष्ट्राल माहितीये की, ते माझ्याविषयी काय बोलतात. मात्र; मी काय आहे, हे महाराष्ट्राला माहितीये म्हणून यावर मला काहीही टिपण्णी करायची नसल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली तर….
ते सुरूवातीपासूनच सीडी आहे…हे आहे..असे माझ्याकडे पुरावे असल्याचे सांगतात. वारंवार मी त्यांना आव्हान दिलं की, माझ्याविरोधात ईडी लावा. त्यांचा जावई जेलमध्ये जाऊन आला. त्यांच्या पत्नींना महिला आहे म्हणून आम्ही जेलमध्ये जाऊ दिले नाही. तेवढी लवचिकता आम्ही त्यावेळी दाखवली. त्यानंतर त्यांनी काही दाखवायला हवं होतं. सगळे धंदे त्यांचे लोकांना माहितीये. यामुळे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली तर लोकं त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
View this post on Instagram
पुरावा देण्याचे केले आव्हान –
वारंवार ते लोकांची दिशाभूल करून माझ्याकडे काहीतरी असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्याकडे माझ्याविरोधात काही असेल तर त्यांनी ते दाखवावे. अन्यथा, मी जर त्यांची एक गोष्ट काही सांगितली तर लोक त्यांना जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील मंत्री महाजन यांनी दिलाय. मी त्यांच्याइतके खालील पातळीवर जाऊ शकत नाही. मी गेल्या सात टर्मपासून आमदार आहे. आता मंत्री आहे. हे बघून त्यांची इतकी जळफळाट होतेय की ते वाटेल ते वक्तव्य करताएत. दरम्यान, त्यांनी माझ्याविरोधात एक तरी पुरावा द्यावा. माझा अंत बघू नका, मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर त्यांना ऑईलपेंट लाऊन तोंड काळं करूनच बाहेर निघावं लागेल, असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
हेही वाचा : VIDEO : खान्देशी आहणा | अहिराणी अभ्यासक डॉ. वाल्मिक अहिरे यांच्याशी विशेष संवाद