मुंबई, 7 डिसेंबर : राज्याच्या महायुती सरकरमधील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज 9 डिसेंबरपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार. 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर असे हे तीन दिवसीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनासाठी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.
विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी –
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळपासून सुरुवात होणार आहे. तीन दिवसांच्या या अधिवेशनकाळात राज्यपालांचे अभिभाषण, आमदारांचे शपथविधी तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित 288 आमदारांच्या शपथविधीला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम हा रविवारीही सुरू राहणार आहे.
विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर –
महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोळंबकर हे सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. दरम्यान, काल राजभवनात कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर आज ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची होणार निवड –
जपासून सुरू होणाऱ्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. यानंतर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
Vidhansabha Session Live : विधानसभा विशेष अधिवेशन 2024; नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लाईव्ह