पारोळा, 10 मार्च : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती यंदा साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा शहरातील सिद्धार्थ नगर येथे उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिद्धार्थ नगर येथे आयोजित केलेल्या या बैठकीत समाज बांधव व पंचशील मित्र मंडळ यांच्या सर्वानुमते समिती अध्यक्षपदी विजय बागुल तर उपाध्यक्षपदी रवी खर्चे यांची निवड करण्यात आली. यासोबतच खजिनदारपदी किरण जावळे, सचिवपदी आनंद वानखेडे, कार्याध्यक्षपदी प्रशिक सोनवणे यांची समिती गठीत करण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
हेही वाचा : मोठी बातमी! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली लाच अन् दोन लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ