महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 13 सप्टेंबर : भडगाव येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या भडगाव शहराध्यक्ष भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (उबाठा) गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टी मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश केला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
भारतीय जनता पार्टीचे पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात वाढते संघटन लक्षात घेता त्यांची महिला सक्षमीकरणावर काम करण्याची पद्धत, युवकांच्या समस्या सोडविणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे या सर्व गोष्टीवर भारावून अमोल शिंदे यांच्यासारख्या शांत,संयमी व सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेतृत्व विश्वास ठेवत आम्ही सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उबाठा) गटाला सोडून भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.
भडगावात शिवसेना (उबाठा) गटाला जोरदार धक्का –
तसेच आज फक्त आम्ही सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला असून आगामी काळात भडगाव तालुक्यात जवळपास 500 पेक्षा जास्त महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. यावेळी प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये भडगाव शिवसेना (उबाठा) गटाच्या भडगाव शहर प्रमुख रिना पाटील, सविता चौधरी,भडगाव शहराध्यक्षा सरिता संजय पाटील,भडगाव शहर संघटीका सरिता पाटील, कोकिळा पाटील, कोकिळा भोई, सुवर्णा बोरसे, मालती पाटील, बेबाबाई पाटील, सुनंदा डामरे, पुजाबाई पाटील, सुनीता शेलार, अनिता पाटील, राधा पाटील आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या प्रवेशाप्रसंगी भाजपा पाचोरा- भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे,भडगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,भाजपा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष देविदास पाटील शहराध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिभाताई साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही पाहा : Video : पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची बहुप्रतिक्षित आणि स्फोटक मुलाखत