• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मराठी पत्रकारितेचे कार्य अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे, IIMC चे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांचे प्रतिपादन

IIMC अमरावतीकडून मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2023
in महाराष्ट्र
मराठी पत्रकारितेचे कार्य अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे, IIMC चे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांचे प्रतिपादन

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाच प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन करताना मान्यवर.

अमरावती, 6 जानेवारी : भाषिक पत्रकारितेने प्रादेशिक स्तरावर लोकशाहीला विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी नेहमीच योगदान दिले आहे. भारतासारख्या बहूसांस्कृतिक आणि बहूभाषिक देशात हे योगदान अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे मराठी पत्रकारितेचे कार्य हे अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे आहे, असे मत भारतीय जनसंचार संस्थानचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांनी व्यक्त केले.

भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्या वतीने आज मराठी पत्रकार दिनानिमित्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते.

यावेळी विचार मंचावर नागपूर येथील दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव, विद्यापीठाच्या मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना प्रा. डॉ. संजय द्विवेदी म्हणाले , भारतीय भाषा या सामान्यांशी संवाद साधण्याच्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भाषा आहेत. ही भूमिका लक्षात घेऊन वाटचाल केल्याने मराठीने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. या कार्यात मराठी पत्रकारितेचे योगदान हे मोलाचे आहे. मराठी पत्रकारितेने भाषेला समृद्ध करण्या सोबतच जनसामान्याला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. मराठी पत्रकारितेच्या प्रेरणेतूनच हिंदी पत्रकारितेचा उदय देखील झाला असल्याचे प्रा. डॉ. द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात मीडिया क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक वाढणार असून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्वतः ला सक्षम करावे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

भाबळे आणि रोमँटिक राहून चालणार नाही –

दै. लोकमतचे श्रीमंत माने म्हणाले , विद्यार्थांनी ज्ञान वृद्धीसाठी आपला जास्तीत जास्त वेळ वापरावा. भाषिक कौशल्य आत्मसात करावी. उत्तम, वाचन मुबलक शब्धसंग्रह, नव-नवीन शिकण्याची तयारी आणि रिस्क घेण्याची क्षमता तुम्हाला परिपूर्ण बनविते. हे युग प्रचंड स्पर्धेचे आहे. यात टिकण्यासाठी आपल्या आकलनाची गती वाढवावी लागेल. भाबळे आणि रोमँटिक राहून चालणार नाही. यश प्राप्तीसाठी प्रॅक्टिकली विचार करावा लागेल असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थाना दिला

दै. तरुण भारतचे गजानन निमदेव म्हणाले , पत्रकारितेच्या क्षेत्रात भाषा व्याकरणाला अधिक महत्व आहे. परिणामकारक संवादासाठी भाषा महत्वाची असून विद्यार्थांनी यासाठी भरपूर तयारी करावी. सोबतच बोली भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावे. पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे याचा विचार करून विद्यार्थांनी त्या दिशेने सक्षम व्हावे. पेड न्युज आणि येलो पत्रकारितेपासून विद्यार्थांनी सावध राहावे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणेसाठी पत्रकारितेचा क्षेत्रात यावे, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. मोना चिमोटे यांचे ही मनोगत झाले.

उपस्थितांना संबोधित करताना आयआयएमसीचे महासंचालक डॉ. संजय द्विवेदी.
उपस्थितांना संबोधित करताना आयआयएमसीचे महासंचालक डॉ. संजय द्विवेदी.

सुरुवातीला महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाच प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल जाधव यांनी तर आभार डॉ. राजेश कुशवाहा यांनी मानले.

यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, साधना समुदाय रेडीयोचे प्रा. संजय घरडे, संजय भोपळे, अरविंद नळकांडे, प्रा. मनोज तायडे, आदर वानखेडे, गिरीष शेरेकर, अमोल इंगोले उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ आशिष दुबे, संजय पाखोडे, राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर, पंकज निखार आदीनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: iimc amravatiiimc amravati latest newsiimc newsmarathi patrakar din iimc

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page