पुणे, 28 एप्रिल : राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची सर्वसाधारण सभा प्रलंबित असल्यामुळे तसेच राज्य धोरण या राष्ट्रीय धोरणावर अवलंबून असल्यामुळे, राज्यातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल खेळाडूंना त्यांच्या कर्तृत्व असूनही आवश्यक लाभ मिळत नाहीत. या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी पहिलवान अबा काळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रितीश चौधरी, ॲड. बी.एम. चौधरी तसेच सॉफ्टबॉलचे प्रशिक्षक व खेळाडूंनी एकत्र येत आज माननीय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली.
यावेळी खेळाडूंच्या विविध समस्या आणि त्यांच्या हक्कांविषयी सविस्तर चर्चा झाली. माननीय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले व तातडीने सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुढील आठवड्यात सॉफ्टबॉल संघ प्रतिनिधी आणि क्रीडा विभाग सचिव व OSD यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून खेळाडूंच्या समस्या मार्गी लावता येतील.
दरम्यान, या पुढाकारामुळे सॉफ्टबॉल खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पहिलवान अबा काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश