• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या, पाचोरा
आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 14 मार्च: पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव (रा. वरसाडे तांडा) असे अटक केलेल्या आरोपी पती-पत्नीचे नावे असून पाचोरा न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा क्रमांक 3 येथील संजय भिमा राठोड (वय ३३) यांनी २६ फेब्रुवारी रोजी आपला भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीच्या रात्री घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक १५/२०२६ नोंदविण्यात आला होता.

यानंतर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि त्यांच्या पथकाने सखोल तपासास सुरूवात केली. या तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव याची चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं –

आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव हिचे आणि विजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने त्याच्या मोबाईलमध्ये सोनालीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकावत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या संजय जाधवने पत्नी सोनालीच्या मदतीने विजय राठोडचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा तसेच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, पोहेकॉ अतुल पवार, पोहेकॉ अभिजित निकम, पोना राहुल बेहरे, पोना पांडुरंग गोरबंजार, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ नामदेव इंगळे, पोकॉ भारत पाटील, पोना दिपक अहिरे, पोकॉ सागर पाटील यांनी केली.

हेही वाचा: VIDEO | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना ₹1,837 कोटींचे वितरण

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora taluka crime newspimpalgoan police stationsuvarna khandesh liveyouth murdered case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 19 | आईच्या आठवणीने भावूक झाली ब्रिटिश गव्हर्नरची नात!

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 19 | आईच्या आठवणीने भावूक झाली ब्रिटिश गव्हर्नरची नात!

March 14, 2026
आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

March 14, 2026
VIDEO | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना ₹1,837 कोटींचे वितरण

VIDEO | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना ₹1,837 कोटींचे वितरण

March 14, 2026
VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 13, 2026
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page