ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 मे : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत, पाचोरा तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मोंढाळे या शाळेला केंद्रास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. हा कार्यक्रम पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पारितोषिक वितरण गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, व शालेय पोषम आहार अधीक्षक सरोज गायकवाड, गटविकास अधिकारी शेलार मॅडम यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक मनोहर सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मोंढाळे यांचे प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, तसेच शापोआ अधिक्षक सरोज गायकवाड मॅडम, वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक मनोहर सोनवणे तसेच सहकारी शिक्षकवृंद यांनी विविध उपक्रम राबवले. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी मदत केली.
मुख्याध्यापक मनोहर सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मोंढाळे तसेच सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच केंद्रप्रमुख नितीन भालेराव यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तालुक्यातील केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.