अहिल्यानगर, 3 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डी साई संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारधार शस्त्रान हत्या करण्यात आली. तसेच एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने साईंची शिर्डी हादरली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
आज पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत. यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुभाष घोडे हे मंदिरातील साईमंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला.
मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. तसेच आरोपींनी या तीनही नागरिकांवर चाकूने असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
याप्रकरणी आता पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला अटक केली आहे. तर राजू माळी या आरोपीचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. या घटना घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे साईबाबा रुग्णालयात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देवून मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली. शिर्डीचे ताराचंद कोते, सचिन चौघुले , शिवाजी गोंदकर, अनिता जगताप , विजय जगताप , कैलास कोते आदींनी रुग्णालयात येवून नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कारवाईसह योग्य उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.