• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सर्पदंशाने जळगाव जिल्ह्यात चार महिन्यात तब्बल 23 जणांचा मृत्यु, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

अंधश्रध्दा न बाळगता सर्पदंशावर वेळीच घ्या वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सर्पदंशाने जळगाव जिल्ह्यात चार महिन्यात तब्बल 23 जणांचा मृत्यु, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन

जळगाव, 26 सप्टेंबर : जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत –
जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश, प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात सर्प रेस्क्युचे काम करत असतात. आतापर्यंत सर्पदंशाच झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

सर्पमित्रांची मोलाची भूमिका –
दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोचार जीवनावश्यक असतात. पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतीची कामे करायला लागतात, अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात, जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते, शेती मशागतीच्या कामांना वेग येतो हाच काळ असा आहे. ज्यात सापांचा वावर वाढतांना दिसून येतो अनेक नागरिक सापांना मारतात तर काही नागरिक साप वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अश्यावेळी सापाचा आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात.

सर्प घरात येऊ नये, सर्पदंश टाळता यावे म्हणून पंचसूत्री –
1) परिसर स्वच्छ ठेवा, अडगळ काढून टाका, अनावश्यक झुडुपे वेली काढून टाका किंवा छाटणी करा, उष्टी खरकटी परिसरात टाकू नका त्या मुळे परिसरात उंदीर येणार नाही .
2) ड्रेनेज पाईपच्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा जेणेकरून त्या द्वारे साप घरात येणार नाही.
3) खळ्यात ,गोठ्यात, शेतात वावरतांना लांब काठी बाळगा , कडबा ,चाऱ्यात एकदम हात घालू नका गोवऱ्या , लाकडे काढताना सावधानता बाळगा.
4) अंगण, घरातील बिळे दरवाज्यांच्या चौकटीतील फटी व्यवस्थित बुजवून टाका
5) मण्यार सारखे विषारी साप निशाचर आहेत त्यामुळे रात्री जमिनीवर झोपणे टाळा, रात्री बाहेर जातांना , शेतात वावरताना, हातात टॉर्च पायात बूट घालायला विसरू नका.

सर्पदंश झाल्यास प्रथमोचार
1) सर्पदंश झाल्यास घाबरून जाऊ नये, सर्वप्रथम वैद्यकीय उपचार लवकरात लवकर कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करावे. रुग्णास धीर द्यावा त्याला जास्त हालचाल करू देऊ नये
2)जखम स्वच्छ पाण्याने धुवावी सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूला आवळ पट्टी बांधून दर 5,10 मिनिटांनी ती सैलं करून परत बांधावी.
3) चिरा देऊ नये, सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये.
4) कोणताही सर्प असो जर त्याचा दंश झाला तर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.

सर्पदंशाच्या अंधश्रध्दांवर विश्वास ठेवू नये –
साप कधीही तुम्हाला स्वतःहून पूढे येऊन चावत नाही , साप डूख धरत नाही, सापाला आपल्या सारखी तीक्ष्ण दृष्टी नसते, त्याला हात ,पाय, बाह्यकान देखील नसतात कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही म्हणून कोणताच साप बदला घेत नाही.
साप चावला म्हणजे मृत्यू नाही प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण 100% वाचतो.

सर्प मित्रांसाठी सूचना –
सर्पमित्रांनी साप वाचवल्यावर उपस्थित जनसमुदायास सर्प अंधश्रद्धाबद्दल जागृत करून वैद्यकीय उपचाराचे महत्त्व समजावून त्या बाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर प्रसिध्दी साठी सपासोबत स्टंट किंवा फोटो सेशन व्हिडिओ बनवू नये. घरात सर्प संग्रह करू नये. जनजागृती करतांना जीवंत सापांचे प्रदर्शन करू नये . नागरिक स्वतःचा आणि सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल करतात. अशावेळी पेट्रोल चार्ज च्या नावाखाली अवास्तव रक्कम मागू नका. सर्प वाचवणे आपले कर्तव्य आहे. पण रिकामे धाडस करू नये स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

May 19, 2026
पिंपरखेड येथील जनाताई भोसले यांचे निधन; ॲड. विश्वासराव भोसले यांना मातृशोक

पिंपरखेड येथील जनाताई भोसले यांचे निधन; ॲड. विश्वासराव भोसले यांना मातृशोक

May 19, 2026
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा अन् कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार?

विधानपरिषद निवडणुकीची घोषणा अन् कर्जमाफीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार?

May 19, 2026
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

May 19, 2026
पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

May 19, 2026
नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

May 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page