महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 24 मार्च : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली गावातून मोठी बातमी समोर आली आहे. अंतुर्ली गावातील कल्पनाबाई भिला भालेराव यांच्या घराला मध्यरात्री 1.30 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तूंसह 4 शेळ्या जळून खाक झाल्याने कल्पनाबाई यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या स्थितीमध्ये प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
घराला लागली अचानक आग –
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली गावातील कल्पनाबाई भिला भालेराव यांच्या घराला रात्री अचानक आग लागली. या भीषण आगीत संसारपयोगी वस्तूंसह अन्न धान्याचे नुकसान झाले. आग इतकी भीषण होती की, या आगीत कल्पनाबाई यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या 4 शेळ्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.
कुटुंबावर उपासमारीची वेळ –
कल्पनाबाई भालेराव यांना 4 मुली व 2 मुले असून त्यांच्या पतीचे मागील 10 वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करत कल्पनाबाई मोठ्या उमेदीने संसाराचा राहटगाडा चालवत होत्या. यासाठी शेळी पालन हे त्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन होते. मात्र, रात्री घराला लागलेल्या भीषण आगीमुळे त्यांच्या 4 शेळ्या जळून खाक झाल्या आणि त्या आर्थिक संकटात आल्या आहेत. घराला लागलेल्या भीषण आगीमुळे कल्पनाबाई यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. या स्थितीमध्ये प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
हेही वाचा : Special Story : जळगाव जिल्ह्यातील श्रृतीची अभिमानास्पद कामगिरी, पहिल्याच प्रयत्नात MES परिक्षेत उत्तीर्ण