• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

बीड, 6 फेब्रवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सध्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेबाबत आता विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आहे. “अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, विमान जमिनीला स्पर्श होण्याआधीच स्फोट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले? –

याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की विमान जमिनीला टच होऊन नंतर कोसळलेले नाही. विमान खाली येताना तिरके झाले होते, मात्र जमिनीला स्पर्श होण्याआधीच त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे विमानाच्या पुढील भागातील प्रवासी बाहेर फेकले गेले आणि त्यानंतर विमान जमिनीला आदळून मोठा स्फोट झाला. त्यामुळे ही घटना संशयास्पद नाही का? विमानात बॉम्ब होता की इंजिनचा स्फोट झाला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून चौकशी सुरू –

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी ते नेहमीप्रमाणे आज सकाळी लवकर मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामतीत विमान लँडिंग करत असताना अचानक भीषण अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह आणखी पाच जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची चौकशी नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून करण्यात येत आहे.

अपघात झालेल्या विमानात कोण-कोण होतं? –

  1. अजित दादा पवार
  2. विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक, मुंबई)
  3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
  4. कॅप्टन संभवी पाठक
  5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

हेही वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: baramati plane crashdcm ajit pawar deathmarathi newsmp bajrang sonwanesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

August 15, 2026
बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

August 15, 2026
महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

August 15, 2026
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

August 15, 2026
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page