सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा/नाशिक, 12 मार्च : राज्यात गांजा तस्करीच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असताना पारोळा तालुक्यात खळबळ उडविणारी घटना समोर आली आहे. गांजा अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या पारोळा तालुक्याती 4 संशयितांना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट 2 चे पोलिस अंमलदार जुंद्रे यांना, सोमवारी 11 मार्च रोजी दुपारच्या सुमार चार व्यक्ती हे लाल रंगाची सॅन्ट्रो कारने (क्रमांक एमएच 14 एई 4317) नाशिक शहरातील द्वारका उड्डाण पुलावरून मुंबई हायवेने अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
दरम्यान, गुन्हे शाखा, युनिट-2 चे वरिष्ठ निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन द्वारका उड्डाणपूल ते पाथर्डी फाटा दरम्यान सापळा रचून लाल रंगाची सेन्ट्रो कारला स्प्लेंडर हॉल समोरील रॅम्प जवळ घेराव घालीत थांबवून रस्त्याच्या बाजूला नेले. वाहनात बसलेले चेतन दीपक पाटील (वय 20), पवन अशोक पाटील (वय 21), प्रशांत गुलाबराव पाटील (वय 29), निलेश विश्वास पाटील (वय 26, सर्व रा. ढोली ता. पारोळा) यांच्या ताब्यातून 18 हजार रूपये किमतीचा 1651 ग्रॅम वजनाचा गांजा व एक लाख रूपये किमतीची कार, 30 हजार रूपयांचे मोबाईल, असा एकून 1 लाख 48 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलिस प्रशासनाने दिले आदेश –
दरम्यान, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सीताराम कोल्हे यांनी नाशिक आयुक्तालयातील अंमली पदार्थ निर्मिती तसेच वाहतून होत असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हेशाखेला आदेश दिले आहेत.
हेही वाचा : राज ठाकरेंना मोठा धक्का, वसंत मोरे यांनी मनसेला केला अखेरचा जय महाराष्ट्र, काय आहे कारण?