संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 19 जून : पारोळा कृष्णा हॉस्पिटल येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे जळगाव जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिवस साजरा कारण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी शिवसेना पारोळा तालुका प्रमुख प्रा. आर.बी.पाटील, शिवसेना पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे, पारोळा माळी समाज अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रमेश अप्पा माळी, उपतालुका प्रमुख दादा पाटील,उप शहर सोमनाथशेठ वाणी, ढोली येथील मच्छिन्द्र अप्पा, पारोळा उप शहर संघटक रविंद्र चौधरी, भूषण भाऊ टिपरे, अल्पसंख्यांक उप शहर प्रमुख नवाज पठाण, शिवसेना शहर संघटक सुनील येवले, उपशहर प्रमुख लखन वाणी, युवासेना तालुका प्रमुख रवी पाटील, युवासेना शहर प्रमुख सनी लोहार, युवासेना उप शहर प्रमुख दिपक पाटील, शिवसेना वाहतूक सेना तालुका प्रमुख तुषार पाटील, सोशल मीडिया प्रमुख कृष्णा शिंपी, युवासेना उपशहर प्रमुख कुणाल पवार, कट्टर शिवसैनिक मनोज लोहार, अल्पसंख्यांक व्यापारी आघाडी शहर प्रमुख विवेक माळी व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अॅड. संदीप गुडवे यांचे प्रतिनिधी अमोल निकम व आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेत दोन गट –
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. कालांतराने पक्षाचा राज्यभर विस्तार झाला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले.
शिवसेना पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. मात्र, 17 फेब्रुवारी 2023 च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. तसेच त्यांना शिवसेना हे मुळ नाव तर पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह देखील देण्यात आले.
हेही वाचा : ‘मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत…’, मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान