चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 19 जून : मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच मी विधानसभा निवडणुकीपर्यंत राहणार आहे, असे मोठे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले. दरम्यान, छगन भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मी कुणालाही भेटलो नाही –
मागच्या काही दिवसांपासून भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना छगन भुजबळांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘तुम्ही चर्चा करणार असाल तर मी काय करणार आहे. मी कुणालाही भेटलो नाही, हे साफ खोटे आहे. मी कधी भेटणार? असा प्रश्न उपस्थित करत मला जर कुठे जायचे असेल तर ओपनली भेटेन’, असे भुजबळ म्हणाले आहेत.
मी नाराज नाही –
भुजबळ पुढे म्हणाले की, ‘मी नाराज नाही. राजकारणामध्ये नाराज होऊन चालत नाही आणि म्हणून राजकारणामध्ये प्रत्येक जण नाराज होत असतो. पण दुसऱ्या दिवशी कामाला लागायचे असते. राहुल गांधी, शरद पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नाव घेत त्यांनी सांगितले की, सगळी लोक नाराज झाली आहेत, पण दुसऱ्या दिवशी कामाला लागले होते. मी सुद्धा कुठेही नाराज नसल्याचे भुजबळांनी यावेळी स्पष्ठ केले.
हेही वाचा : “लासगाव बरडीवरील सोलर प्रकल्प रद्द करा!,” ग्रामस्थांची तीव्र मागणी, ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेन