• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2023
in जळगाव शहर, खान्देश, जळगाव जिल्हा
समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण.

जळगाव, 26 जानेवारी : सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या. परस्पर सहकार्याने आणि समन्वयातून आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची सर्वांगिण प्रगती करण्यासाठी कटीबद्ध होऊ या, असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले पालकमंत्री –

उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील पाटील म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन आपण लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला वर्तमानात प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्नशील आहोत.

सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरू आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरु, लाला लजपतराय, लालबहादुर शास्त्री, सरोजनी नायडू, लोकशाही सारख्या उदात्त मुल्यांचा वारसा देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महान विभूतींच्या त्यागातून भारताच्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर भारत वर्षाची निर्मिती झाली.

त्यांच्या आदर्श विचारांच्या प्रकाशवाटेत देशाने आतापर्यंत यशस्वीरित्या सर्व क्षेत्रात वाटचाल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची घोडदौड उत्तरोत्तर उन्नत होत आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, शिल्पकला, नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी, औद्योगिक, पर्यटन या सगळ्यांसह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच उज्वल वाटचाल होत रहावी, यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या. परस्पर सहकार्याने आणि समन्वयातून आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची सर्वांगिण प्रगती करण्यासाठी कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

कोण कोण होतं उपस्थित –

भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यास महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे यांचेसह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

संचलनामध्ये यांचा सहभाग –

प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच पोलीस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली. तसेच पालकमंत्री पाटील यांनी पोलीस दलाच्या तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले. या संचलनात पोलीस मुख्यालय पुरुष/महिला, पोलीस मुख्यालय पुरुष, होमगार्ड पुरुष, एम. जे. कॉलेज NCC मुले, सेंट जोसेफ NCC बहिणाबाई युनिर्व्हसिटी NSS, आर. आर. विद्यालय RSP मुली, ओरियन इंग्लीश मिडीयम स्कुल स्काऊड व गाईड, आर. आर. विद्यालय गाईड मुली, सेंट.जोसेफ RSP मुले/मुली, श्रीराम माध्यमिक विद्यालय-RSP मुले, आर. आर. विद्यालय RSP मुले, श्रीराम माध्यमिक विद्यालय, RSP मुली, सेंट. जोसेफ गाईड मुली, सेंट. जोसेफ, स्काऊड मुले, स्टुडंट पोलीस कॅडेट आदि सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patil jalgaonjalgaon republic day 2023minister gulabrao patilrepublic day 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 22, 2025
Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील  दुर्दैवी घटना

Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

June 21, 2025
चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धि’  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धि’  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

June 21, 2025
Video | “मी संघाच्या कार्यक्रमाला आलो!” मुख्यमंत्र्यांच्या धरणगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंची उपस्थिती, कार्यक्रमानंतर काय म्हणाले?

Video | “मी संघाच्या कार्यक्रमाला आलो!” मुख्यमंत्र्यांच्या धरणगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंची उपस्थिती, कार्यक्रमानंतर काय म्हणाले?

June 20, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page