पाचोरा, 22 जानेवारी : नुकत्याच जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले आहे.
17 वर्षा आतील गटात कु. ललित मनोज महाजन याने 68 ते 73 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. स्मिती प्रवीण पाटील हिने 42 ते 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तर कु. ऋतुजा रणजीत पाटील हिने 44-46 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशस्वी कामगिरीनंतर या सर्वच विद्यार्थ्यांची धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धुळे येथे होणाऱ्या स्पर्धेत यश मिळवण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर राहणार आहे.
हेही वाचा – वडगाव कडे येथे त्रितपपूर्तीची सांगता, शेवटच्या दिवशी आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती
दरम्यान, जिल्हास्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल निर्मल इंटरनॅशनल स्कूल संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे यांनी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक नंदकिशोर पाटील, गणेश मोरे, अरविंद पाटील, वैभव हटकर, जितेंद्र पाटील, लक्ष्मी पाटील या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.