ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 ऑक्टोबर : स्वातंत्र्यप्राप्तीपासून आदिवासी बांधवांना मूलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी संघर्ष करावा लागतोय. तुम्ही एकसंघ असलात तर तुमच्या मूलभूत समस्या ह्या तत्काळ सुटतील. यामुळे समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी केले. पाचोऱ्यात आदिवासी तडवी भिल समाजाचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आदिवासी तडवी भिल समाजात 10-12 संघटना असतील. मात्र, संघटना बाजूला एकत्रित येऊन समाजाच्या हितासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण आपले सगळे विचार बाजूला ठेऊन समाजाच्या हितासाठी एकत्रित आले पाहिजे, असे आवाहनही आमदार किशोर पाटील यांनी केले. तुम्ही एकसंघ असलात तर तुमच्या मूलभूत समस्या ह्या तत्काळ सुटतील, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.
…अन् आमदार पाटील यांनी सांगितला गहुल्याचा किस्सा –
सातगाव डोंगरीच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गहुल्या गावाबाबतच्या समस्येवर बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपुर्वी मी त्याठिकाणी गेलो असता, गहुला ह्या गावातील लोकांना आपल्या तालुक्याचा आमदार कोण हे माहिती नाही. त्याठिकाणी रस्त्यांसह अनेक प्रश्न होते. तसेच त्या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्याठिकाणी पाचवी नंतर एकही मुलगा शिकला नाही. याचे कारण म्हणजे गहुल्याहून सातगाव डोंगरी आणि शिंदाड या गावाला जाण्याचा रस्ता नाही. म्हणून त्याठिकाणची विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिली.
शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज –
मात्र, याबाबत मी तात्काळ लक्ष देऊन त्या सगळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत बसवलं आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर थेट शिंदाडवरून गहुल्यापर्यंत डांबरी रस्ता केला. आणि गहुल्यावरून सातगाव डोंगरीपर्यंत डांबरी रस्ता केला. आज त्या गहुल्याला एसटी बस त्याठिकाणी येईल, अशी व्यवस्था केली. दरम्यान, शरीराने काटक असलेला आणि संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे. आणि म्हणून या समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील आमदार किशोर पाटील म्हणाले. तसेच आदिवासी बांधवांना विनंती आहे की, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
यांची होती उपस्थिती –
आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या मेळाव्याला आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अँड. रणजित तडवी, मुराद तडवी, जलाल तडवी, सरवर तडवी, आलेरखा तडवी, नसरुद्दीन तडवी, अफसर तडवी, अफजल तडवी, धर्मा भिल्ल, मुनीर तडवी, काशिनाथ तडवी, मनसुर तडवी, रज्जाक तडवी, भिकन तडवी, शकुर तडवी, आशाबाई शेरखा तडवी सरपंच भोजे, अस्लम तडवी भोजे, सलाबत तडवी, रफिक तडवी, हुसेन तडवी, नपिसा तडवी, शिराज तडवी, आदी उपस्थित होते.