• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 11, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला आज 11 फेब्रुवारी रोजीपासून पोलीस मुख्यालय, जळगाव येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली आहे.

आज भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी ३४० उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिले असून, ४१ उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र, तसेच १७९ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र ठरलेले आहेत. विहित निकषांनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीअंती १२० उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत.

संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर –

सदरची संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर (Merit) आधारित असून, यात मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची नजर असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व चाचण्या पार पडत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन –

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व उमेदवार आणि त्यांच्या पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की, काही समाजकंटक किंवा दलाल “मी तुमची पोलीस भरतीत निवड करून देतो” असे खोटे सांगून पैशांची मागणी करण्याची किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारांनी अशा कोणत्याही भुलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये. पोलीस भरतीसाठी कोणालाही पैसे देणे किंवा घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

जर कोणत्याही व्यक्तीने भरती करून देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली किंवा आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर उमेदवारांनी घाबरून न जाता तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया केवळ आणि केवळ कष्टाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावरच पार पडणार असल्याने, उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा : पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon police recruitmentpolice bharti 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

August 15, 2026
महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

August 15, 2026
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

August 15, 2026
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page