• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातून आमदार किशोर आप्पांना तिसऱ्यांदा मिळालं तिकीट; शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी वाचा, एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2024
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पाचोऱ्यातून आमदार किशोर आप्पांना तिसऱ्यांदा मिळालं तिकीट; शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी वाचा, एका क्लिकवर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 45 जणांना उमेदवारी देण्यात आली असून पाचोऱ्यातून विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार किशोर आप्पांनी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केल्यानुसार उद्या 24 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर –
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर केली असून काल रात्री उशिराने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिवसेना पक्षाकडून पहिल्या यादीत 45 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे सेनेच्या ज्या नेत्यांना यापूर्वी संधी दिली नव्हती त्यांना संधी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी –
गेल्या दहा वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील करत आहेत. याठिकाणी मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले आणि आता सध्या भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे देखील भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देत रात्री त्यांच्या नावासह एकूण 45 उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील हे आता आमदारकीच्या हॅट्रिकसाठी निवडणुकीच्या रिंगणात असून येत्या 24 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जळगावात शिवसेना उमेदवारांची नावे –
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर (आप्पा) धनसिंग पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
चोपडा – लता सोनवणे

शिवसेनेच्या 45 उमेदवारांची नावे –

  1. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ संभाजी शिंदे
  2. साक्री – मंजूळाताई तुळशीराम गावित
  3. चोपडा- चंद्रकांत बळवंत सोनावणे
  4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव रघुनाथ पाटील
  5. एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
  6. पाचोरा – किशोर (आप्पा) धनसिंग पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
  8. बुलढाणा – संजय रामभाऊ गायकवाड
  9. मेहकर – डॉ. संजय भास्कर रायमुलकर
  10. दर्यापुर – अभिजीत आनंदराव अडसूळ
  11. रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल
  12. भंडारा – नरेंद्र भोजराज भोंडेकर
  13. दिग्रस – संजय दुलीचंद राठोड
  14. नांदेड उत्तर – बालाजी देविदासराव कल्याणकर
  15. कळमनुरी – संतोष लक्ष्मणराव बांगर
  16. जालना – अर्जुन पंडितराव खोतकर
  17. सिल्लोड – अब्दुल सत्तार अब्दुल नबी
  18. छ. संभाजीनगर मध्य – प्रदिप शिवनारायण जैस्वाल
  19. छ. संभाजीनगर पश्चिम- संजय पांडूरंग शिरसाट
  20. पैठण – विलास संदिपान भूमरे
  21. वैजापुर – रमेश नानासाहेब बोरनारे
  22. नांदगाव – सुहास द्वारकानाथ कांदे
  23. मालेगाव बाह्य – दादाजी दगडूजी भुसे
  24. ओवळा माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक
  25. मागाठाणे – प्रकाश राजाराम सुर्वे
  26. जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा रविंद्र वायकर
  27. चांदिवली – दिलीप भाउसाहेब लांडे
  28. कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर
  29. माहिम – सदा (सदानंद) शंकर सरवणकर
  30. भायखळा – यामिनी यशंवत जाधय
  31. कर्जत – महेंद्र सदाशिव थोरवे
  32. अलिबाग – महेंद्र हरी दळवी
  33. महाड – भरतशेठ मारूती गोगावले
  34. उमरगा – ज्ञानराज धोंडीराम चौगुले
  35. परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत
  36. सांगोला – शहाजी बापू राजाराम पाटील
  37. कोरेगाव – महेश संभाजीराजे शिंदे
  38. पाटण – शंभूराज शिवाजीराव देसाई
  39. दापोली- योगेश रामदास कदम
  40. रत्नागिरी – उदय रविंद्र सामंत
  41. राजापूर – किरण रविंद्र सामंत
  42. सावंतवाडी – दीपक वसंतराव केसरकर
  43. राधानगरी – प्रकाश आनंदराव आबिटकर
  44. करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके
  45. खानापूर- सुहास अनिल बाबर

हेही पाहा :  MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilshivsenashivsena announced candidateshivsena candidate listvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page