मुंबई, 29 ऑक्टोबर : लाडकी बहीण योजनेमुळे कशाप्रकारे घरातील पैश्यांची कमतरता दूर झाली, आणि कुटुंब एकत्र अशा आशयाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोस्ट करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये लाडकी बहीण योजेनेमुळे कुटुंबातील सर्वांना एकत्र दिवाळी साजरी करता येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. “माझ्या भगिनींच्या, मायमाऊलींच्या जीवनात सुख आणि आनंद बहरत राहील, त्यांचं कुटुंब हसतं-खेळतं राहील, यासाठी मी वचनबद्ध आहे..!”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
अजित पवार बारामतीतून उमेदवारी अर्ज केला दाखल-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बारामतीत मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. यावेळी दोन कोटी 40 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा, तर 44 लाख शेतकऱ्यांना वीजबिलमाफीचा लाभ शासनाने दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा : बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल