मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 30 ऑक्टोबर : चोपडा येथे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चुंचाळे येथील अनेक दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.
यांनी केला शिवसेनेत प्रवेश –
नंदलाल गोविंदलाल चौधरी (माजी पंचायत समिती सदस्य), मयूर ज्ञानेश्वर चौधरी (चेअरमन), सुनील पांडुरंग पाटील (विकास सोसायटी सदस्य), लिलाचंद आनंदा चौधरी (दूध डेअरी चेअरमन), नरेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, दीपक कोळी, किशोर शिंपी, राजेंद्र चौधरी, सुरेश खैरनार, शैलेश चौधरी, प्रज्वल चौधरी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी घनश्याम भाऊ अग्रवाल, नरेंद्र पाटील (सभापती कृ. ऊ. बा. स. चोपडा), विकास पाटील, राजूभाऊ बिटवा, एम. व्ही. पाटील सर, गोपाल चौधरी, कैलास बाविस्कर, नाना छगन, संजय शिंदे, देविदास सोनवणे, सुखलाल कोळी, किरण देवराज उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपड्याचे आमदार म्हणून प्रथमतः निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी भाजपमध्येमध्ये असलेले प्रभाकर सोनवणे ह्यांनी 2019 साली अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना लताताई सोनवणे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले होते. आणि आता त्यांना शिवसेनना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार आहे.
हेही वाचा : Pachora News : डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याप्रकरणी पाचोऱ्यात राजकीय वातावरण तापले, नेमकं काय प्रकरण?