जळगाव, 26 जानेवारी : जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी डॉ. नयना नितीन महाजन (झोपे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर ज्ञानभारती फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती कुमावत, अॅड. श्रध्दा काबरा, अॅड. वैशाली बोरसे, सौ. मंगला उबाळे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. नयना महाजन (झोपे) या सध्या डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत.
अमेरिकेतून मिळाली अमेरिकेतून मिळाली आहे मानद पीएचडी –
डॉ. नयना नितीन महाजन (झोपे) यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातुन पीएचडी मिळवली आहे. यासोबतच त्यांनी साऊथ वेस्टर्न अमेरिका युनिव्हर्सिटी युएसएतर्फे ह्युमन राईट्स प्रोटेक्शनमध्ये मानद पीएचडी मिळवलेली आहे. तसेच डॉ. नयना नितीन महाजन (झोपे) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा – समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
सध्या डॉ. नयना नितीन महाजन (झोपे) यांच्या मार्गदर्शनाखाली 4 संशोधक हे पीएचडी करत आहेत. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी डॉ. नयना नितीन महाजन (झोपे) यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. ज्ञानभारती फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती कुमावत, अॅड. श्रध्दा काबरा, अॅड. वैशाली बोरसे, सौ. मंगला उबाळे यांनी त्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.