• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

खासदार संजय राऊत यांचा गुलाबराव देवकरांच्या सभेत घणाघात, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2024
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
खासदार संजय राऊत यांचा गुलाबराव देवकरांच्या सभेत घणाघात, नेमकं काय म्हणाले?

धरणगाव, 15 नोव्हेंबर : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक टपरीवाल्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. पण हा टपरीवाला शेवटी लायकीवरच गेला. त्याला घरी बसविण्याची वेळ आता आली असून, 23 तारखेनंतर तो तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही, अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धरणगावात केली.

संजय राऊत काय म्हणाले? –
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी धरणगावातील कोट बाजार भागात शिवसेना कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत खासदार राऊत यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना गुलाबराव पाटील धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही. त्यांना दारूत टाकायला पाणी मिळते, लोकांना मात्र पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात उद्योग आणले नाही पण सट्टा, पत्ता, वाईन शॉप आणले. मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंचे पाय धरत होते, एका क्षणात सगळे विसरून सुरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात निष्ठेच्या मोठ्या गप्पा मारायचे. या टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मोठे केले म्हणून छाती ठोकून सांगायचे. आज गद्दारी केल्याने ते निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यांना तोंड लपवत फिरावे लागत आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

धरणगाव शहराचा कायापलट करणार : गुलाबराव देवकर
गेल्या 10 वर्षात विकासाचे कोणतेही व्हीजन नसलेल्या नेतृत्वामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. धरणगावात 20 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरूणांच्या हाताला रोजगार नाही. अनेक बेरोजगार कामासाठी जळगावला जाताना दिसतात. अवैध धंद्यांना सगळीकडे ऊत आला आहे. बेसुमार वाळू उपाशामुळे नद्यांची पात्रे पोखरली गेली आहेत, याकडे लक्ष वेधून सेवेची संधी मिळाल्यास सर्वप्रथम धरणगाव शहराची पाणी टंचाई दूर केली जाईल. एखादा मोठा उद्योग आणून धरणगाव तालुक्याचा कायापलट केला जाईल, असे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिले.

यांची होती प्रमुख उपस्थिती –
यावेळी उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, कृऊबासचे माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, महिला तालुका प्रमुख जनाबाई पाटील, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी व दीपक वाघमारे, उद्योजक सुरेश चौधरी, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, संतोष सोनवणे, नाना ठाकरे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : “…तर त्यांना मोठी जबाबदारी देणार”, चाळीसगावात मंगेश चव्हाण यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकं काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokarjalgaon graminminister gulabrao patilmp sanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page